संपर्क

Tuesday, 19 May 2020

सर मी तयार आहे......

आज संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट आहे.दोन महिन्यापूर्वी बंद झालेल्या शाळा अजून दीड-दोन महिने तरी सुरू होणार नाहीत.कोरोनाचे सावट लवकरात लवकर दुर होऊन आपण आप-आपल्या शाळांमध्ये ,विद्यार्थ्यांमध्ये केव्हा जातो असे प्रत्येक शिक्षकाला नक्कीच वाटत असणार.परिस्थिती कशीही असो पण शाळेत परतण्याची तीच उत्कट इच्छा माझ्या विद्यार्थ्यांचीही असेल हे नक्की,अन् माझा प्रत्येक विद्यार्थी माझी वाट पाहत मनोमन म्हणत असेल..."तुम्ही शाळेत या सर ...*मी तयार आहे*."

- *सर मी तयार आहे* -

किलबील पाखरांनी
सांगा कधी फुलेल मळा.....
पुरे झाल्या सुट्या
आता भरवाना शाळा....
पाटी-पुस्तक-डब्बा भरून ,
आई- बाबाला नमस्कार करून .......
*सर मी तयार आहे*


संपल्यात गोष्टी आजीच्या
चवा सारख्याच भाजीच्या.....
बाबाही थकलेत शोधून(माझ्यासाठी )
रोजचं नव-नवीन काही.....
आज कळतंय..फोन
                    अन् टि.व्ही.च
हे जगच आपलं नाही
म्हणूनच तर
खिचडी भात खाऊन.....
मैदानावर हुंदडायला...
*सर मी तयार आहे*


म्हणाल तसं वाचेल सर
कवितांवर सुद्धा नाचेल सर
उजळणी-पाढे एका सुरात
चुकणार नाही हातच्या घरात
खोडी माझी नसेल जरी
छडी खायला .......
*सर मी तयार आहे*


फाटली पुस्तके वापरू जुनीच
कपडे ठिगाळ लावून घालू
कोऱ्या पानांची जोडणीही
ताईने काल केलीय चालू
घरचं सारं कमी-जास्त....
 तुम्हीच जाणता ना
पेन-पेन्सिल-पट्टी.....
म्हणूनच तर आणता ना
दिल्या चित्रात रंग   भरण्यास .......
संधीच सोनं करण्यास....
*सर मी तयार आहे*


दोन महिने झालेत बाबांनी
खाऊ नाही आणला राव
कुण्या चिनी रोगाने
मामाचा बंद केलाय गाव
माझा सारा आनंद सर
फक्त न् फक्त तुमच नाव
राहुन दुर अंतराने...
वेळोवेळी हात धुऊन
मीही तुमच्या सोबत आहे
जगाला साऱ्या दाखवून  देऊन
कोरोनाशी लढाण्याला.......
*सर मास्क घालून मी तयार आहे*😷


 ~• *दिनेश दाभाडे,कन्नड* •~

सदर कविता व्हिडीओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक पाहा-
         https://youtu.be/L3xUKq4L3zA


भेटत राहा.....

  🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही * अजून वेळ हवा होता ...