संपर्क

Sunday, 28 December 2025

भेटत राहा.....

 





🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही *अजून वेळ हवा होता* अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती.जे आठवलं ते अन् मनात कुठलीही संकोच न ठेवता गप्पामध्ये दिवस कसा निघून गेला कळलच नाही.गेट टुगेदरसाठी काँलेज उपलब्ध न झाल्याने *नेचर नेस्ट* या पिकनिक स्पाँटला जमण्याचे नियोजन झाले अन् दिवसभर फिरल्यानंतर नवनाथ अन् निरंजनने केलेली ठिकाणाची निवड योग्य असल्याचे लक्षात आले.येवढ्या वर्षानंतर भेट होणार म्हंटल्यावर प्रत्येकालाच सर्वांना भेटण्याची उत्सुकता होती.सुरूवातीला सर्वांमध्ये झालेले बदल हाच हास्याचा विषय होता.नाश्त्यासोबत गप्पा,हुर्ड्यासोबत गप्पा,जेवणासोबत गप्पा ........ एवढ्या गप्पा  झाल्या तरीही गप्पांचे विषय काही संपले नाही. 

            सर्वात शेवटी  *राऊंड टेबलवर*   काँलेज संपल्यापासून ते आजपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले चढ-उतार,सुख-दुःख,आठवणी  प्रत्येकाने आपापल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला.यावेळी तर वेळेअभावी बोलणार्या प्रत्येकाला विनंती करून थांबवून दुसऱ्याला बोलण्याची संधी देण्यात आली.या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्याच्या मागील 18 वर्षाच्या प्रवासाचा साक्षीदार होण्याचा योग आला हे नक्की.निरंजनने आणलेले जुने अल्बम काँलेजच्या आठवणी ताजा करून गेले. टेबलवर झालेल्या गप्पानंतर तर असे वाटायला लागले की ही भेट 18 वर्षानंतरची नाही तर 18 दिवसानंतर झाली अन् प्रत्येकासोबत आपुलकीची नाते अधिक घट्ट झाले .गेट टुगेदरची आठवण म्हणून प्रत्येकाला सुंदर मेमेंटो भेट म्हणून देण्यात आला.

       खरं तर ह गेट टुगेदर म्हणजे फक्त मेळावा नव्हता तर प्रत्येकाच्या मनाच्या,आठवणींच्या,आपुलकीच्या  धाग्यांची पुर्नबांधणी होती.वेळेअभावी खुप सारे आपले मित्र या सोहळ्याला येऊ शकले नाही त्यांना सर्वांनी miss केले, त्यांनीही या सुंदर दिवसाला miss केले असे म्हणायला हरकत नाही. लवकरच पुन्हा भेटण्याच्या अटीवर सर्वांनी निरोप एकमेकांचा घेतला.

        प्रत्येक  जण आयुष्य जगत आहे..... परंतु  अधूनमधून भूतकाळातील माणसांना भेटून आयुष्याला पुन्हा,जोमाने रिस्टार्ट करण्याची संधी मिळवण्यासाठी वेळ काढून *भेटत राहा.*  

          
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

No comments:

Post a Comment

भेटत राहा.....

  🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही * अजून वेळ हवा होता ...