संपर्क

Thursday, 21 January 2021

🌱 *नवा अध्याय -चटोपाध्याय* 🌱

 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

🌱 *नवा अध्याय -चटोपाध्याय* 🌱

आज शैक्षणिक सेवेत रूजू होऊन १२ वर्षे पुर्ण होत आहेत.ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर सुरू झालेला प्रवास आज औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी जवळ असणाऱ्या शाळेपर्यंत अविरत चालू आहे.काम करतांना प्रत्येक दिवस नवा अनुभव देत गेला.या काळात पहिलीचा वर्ग शिकवण्याची सवय आवडीमध्ये रूपांतरीत झाली.प्रामाणिकपणे सांगायचे तर आजही या पवित्र क्षेत्रात आत्मशांती शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.विद्यार्थ्यांना सर्वांगांने देण्याचा;त्यांचे हित जोपासण्याचा व आत्मिक समाधान मिळवून घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला ; करीत राहणार.कित्येक गरीब परंतु अतिशय हुशार विद्यार्थी भेटले ज्यांच्या घरी दोन वेळच्या जेवणाची सोय नसते,त्यांची खडतर परिस्थिती त्यांना शेवटी शुन्य Output स्विकारायला भाग पाडते.....अशावेळा समाजाबरोबरच स्वतःची चीड येते.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणाबरोबर त्याची एखादी तरी समस्या ठरलेलीच असते, अशा समस्यांना तोंड देत आपली शिक्षणाची भूक भागवण्याचा प्रयत्न करणारेही विद्यार्थी मी पाहीले आहेत.खरे पाहता हेच विद्यार्थी खरे प्रेरक असतात.

नक्कीच या काळात शिक्षण क्षेत्रात आवडीने काम करणारे काही प्रेरणादायी शिक्षक/अधिकारीही भेटत गेले ज्यांच्याकडे पाहून अधिक उत्साहाने या ज्ञानयज्ञात स्वतःला झोकून दिले.

आज चटोपाध्याय लागू होतांना एक अध्याय संपला तर दुसरा चालू होत असतांना चांगले ते स्विकारून पुढील वाटचालीत अधिकाधिक चांगले कर्म हातून घडून येवो,अधिकाधिक विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त होवो हीच श्रीगणेशा चरणी प्रार्थना.🙏💐

जुन्या आठवणींची चित्रफित जरूर पाहा-

https://youtu.be/5D_39rzsNrc


-श्री.दिनेश हरिभाऊ दाभाडे (प्रा.शिक्षक ,जि.प.प्रा. हिवरखेडा गौताळा ता.- कन्नड ,जि.- औरंगाबाद) 

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

भेटत राहा.....

  🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही * अजून वेळ हवा होता ...