संपर्क

Thursday, 2 July 2020

मिञांनो,आज३४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने   जगलेल्या आयुष्याची आवर्जुन गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आयुष्यात कुटुंबीय,नातेवाईक,मित्र या सार्याची आपल्या     स्वतः इतपतच मोजणी  करावी लागते. त्यांच्या  शिवाय आयुष्य पुर्णही होऊ शकत नाही हेही खरं आहे.आपल्या विचारांएवढाच त्यांच्या विचारांचा विचार वेळोवेळी करावा लागतो अन्यथा एक तारेवरची कसरत ठरलेलीच समजा.सुखी होण्यासाठी  समाधानी व्हावे असे म्हणतात पण असा सुखी मनुष्य मला तरी आजुन भेटला नाही.   कितीही मनभरून जगलं तरी आपल्या किंवा इतरांच्या नजरेतुन  कायमच रितेपणा आवर्जून सतावतो अन् क्षणाक्षणाला वाटत असते काहीतरी *बाकी आहे.....*

-कविता-

  *बाकी आहे.....*

कुण्या नात्यातल्या
कुण्या मैत्रीतल्या
विस्कटलेल्या साऱ्या माणसांचा
घालायचा मेळ बाकी आहे

विश्वासाचे,संयमांचे
हक्क अन् जबाबदाऱ्यांचे
स्वतःशीच घेतलेल्या पैजांचे
जिंकायचे खेळ बाकी आहे

स्वतःला शोधायची
जगाला अर्पायची
स्वार्थ ,द्वेष,कामना सोडून
भक्ती रसात रंगायची वेळ बाकी आहे

होतो दुरून पाहत
माझेच आयुष्य मी
होईल कधीतरी फुरसतींशी
जी भेट बाकी आहे

झाल्या चुका नकोत्या
खोडून काढल्या मी
हवी जगास साऱ्या
आयुष्यात ती नोंद बाकी आहे

मी आहे ,मी आहे ,मी आहे
कुणा हवा - नको तो
आजमावून घ्या हवेतर
जोवर प्रत्येक श्वास बाकी आहे

-श्री.दिनेश हरिभाऊ दाभाडे
(प्रा.शिक्षक,कन्नड )
9404590560 


भेटत राहा.....

  🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही * अजून वेळ हवा होता ...