संपर्क

Monday, 8 June 2020



 *आनंदसोहळा*




नमस्कार मिञांनो.....

                 गझल वाचायला,ऐकायला आवडते,खुप दिवसांपासून एखादी गझल लिहावी असे वाटत होते,आज प्रयत्न केला आहे.,,,,पहिलाच प्रयत्न आहे...गझल कशी वाटली ते नक्की कळवा!!!!!
                माझा मुलगा *श्रीजीत* १० जून २०२० ला ३ वर्षांचा होतो आहे.त्याच्याविषयी...त्याच्याविषयी म्हणण्यापेक्षा सर्वच लहानग्यांविषयी त्यांच्या आई-वडीलांना वाटणारे प्रेम, आपुलकी, सहवास, जिज्ञासा, अपेक्षा आणि बरेच काही शब्दबद्ध करावे असे वाटले अन् खालील रचना उदयास आली........
    
 मथळा-
("जन्मलेले सारेच इथे ...आज तुला ऐकणार आहे 
मी तुझ्या प्रेमात आहे ...बाकी कुणी लिहीणार नाही 

"वाचण्या माणसांचे चेहरे ...शिकवूनी मी जाणार आहे

गाठ तुझ्या माणसांची ...घातल्या शिवाय मी मरणार नाही ")


गझल- 
*"आनंदसोहळा"*



जन्म तुझा आनंदसोहळा...आमचाच स्वार्थ समजा

ओसाड जीवनाला मिळाला... आमच्याच अर्थ समजा



डोळ्यात लाख स्वप्ने...ओठात हट्टी कोडे

तुझ्या चिमुकल्या सुखांनी...आम्ही जगतोय आज                                              समजा
                          



तू साखरेच पोतं... आम्ही होतो हत्ती घोडा

हरवले बालपण आमचे...गवसलेच आज समजा



आम्हीच खेळ सारे...विश्वातील सप्तरंग तारे

घेण्या गगनभरारी तुला...ही तालीम आज समजा



तू हट्ट कर,राग धर...रडतोस जेव्हा कधी तू

आमच्या प्रयत्नांचे इमले...पडले क्षणात समजा



बाळा खांद्यावर बसोनी... जगाची सैर होत नसते

हातात हात माळून...हा थोडाच प्रवास समजा



दिवसातून कितीदा...शब्दफुले माळतो आम्ही 

विनवण्या विधात्या...भक्तांची सुगंधी लाच समजा



श्रीगणेशाला हात जोडून...जेव्हा जेव्हा सुख मागतो                                                              आम्ही  श्रीजीतकडे बोट त्याने...दाविलेच समजा


- दिनेश हरिभाऊ दाभाडे 
(प्रा.शिक्षक ,कन्नड )

सदर गझल व्हिडीओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक उघडा-
https://youtu.be/ReiZHo9CF20


भेटत राहा.....

  🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही * अजून वेळ हवा होता ...