संपर्क

Tuesday, 7 October 2025


खरतर त्याच्या नावापुढे कैलासवासी लावायची मनापासून इच्छा होत नाहीये......
७० वर्षे जगणारा व्यक्ती जी कामं करू शकणार नाही अशी कामं यानी फक्त ३३ वर्षे वयात केली.....

अशी कौतुकाची बिरूदं ज्याला लावली गेली त्या काल आम्हाला सोडून गेलेल्या आमच्या लाडक्या मित्राच्या अंत्यविधीच्या शोकसभेत.वर्शी नावाच्या छोट्याश्या गावातून शिकून मोठा झालेला आमचा मित्र *शशिकांत समशेर*.कमी वयात वडीलांचे छत्र गमावलेल्या समशेरने या स्पर्धेच्या युगात शिक्षकी पेशात नोकरी मिळवून स्वतःला सिद्ध केले.काल त्याच्या गावात जसा मित्रांचा गोतावळा पहायला मिळाला तसाच कन्नड तालुक्यात नोकरीच्या ठिकाणी काही दिवसातच त्याचा मित्रांचा गोतावळा तयार झाला.जिभेवर साखर असल्यामुळे अन् वागण्या-बोलण्यात प्रामाणिकपणा असल्यामुळे गोतावळा तयार करायला वेळ लागला नाही.नागापूर सारख्या दुर्गम केंद्रात विद्यार्थी-शिक्षक सेवेची मिळेल ती कामे करत-करत जसा तो सुपरिचीत झाला,तसाच तो तालुक्यातही झाला.वेगवेगळ्या कारणांसाठी नवीन सहकार्याबरोबर जुन्या लोकांची मोट बांधण्याचे काम तो सहज करायचा.सर्वांना वैयक्तिक फोन करून मित्रांचे वाढदिवस साजरे करण्याचा जणू त्याने विडाच उचलला होता.एखाद्या गोष्टीचे नियोजन करायला हा सर्वात पुढे असायचा.हातात घेतलेले  काम मनापासून,निस्वार्थपणे पुर्ण करण्यात त्याचा हातखंडा होता.मित्रांच्या कुठल्याही प्रसंगात सहज उपलब्ध होणारा हा आमचा मित्र.नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असलेला पण मनाने पुर्णपणे घरीच असायचा.आई-बहीणीची काळजी,कौटुंबिक जबाबदाऱ्या,गावाकडील गोतावळा सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचा.मागच्या वर्षी आजारी असलेल्या बहीणीसाठी त्याची झालेली धावपळ आम्ही पाहिली आहे.त्याच्या गावात श्री स्वामी समर्थ केंद्राची पायाभरणीत महत्त्वाचे योगदान त्याने दिले.तसेच गावात नव्या पिढीतील मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करायचा. अश्या धार्मिक,सामाजिक ,शैक्षणिक,कौटुंबिक सर्वच बाजू त्याने लिलया पेलल्या होत्या.शेवटच्या सभेत गावाकडच्या मंडळींनी,आप्तेष्ठांनी त्याचे केलेले कौतुक,मित्रांचा कोमेजलेला गोतावळा पाहून त्याची गावाकडील घट्ट नाळ लक्षात आली.तो जाण्याचे दुःख जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत दिसत होते. 
            मनाने हळव्या असलेल्या आमच्या लाडक्या मित्राला नको त्या वयात आमच्या पासून नियतीने हिरावून घेतले.हे जाणे त्यालाही अनपेक्षितच होते.कालचा दिवस तुझा नव्हता म्हणण्या ऐवजी कालचा दिवस आमचा नव्हता असे प्रत्येकाला वाटत होते.कुटुंब,आप्तेष्टांसह सर्व मित्र परिवाराला आज *चटका* लावून गेलास मित्रा🙏

No comments:

Post a Comment

भेटत राहा.....

  🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही * अजून वेळ हवा होता ...