संपर्क

Wednesday, 24 September 2025

*७ वर्षे साथ देणारे ब्रँण्ड देशमुख*

 


➖▪️➖▪️➖▪️➖▪️➖▪️➖

*७ वर्षे साथ देणारे ब्रँण्ड देशमुख*


आजकाल माणसांच्या बाजारात चांगली  माणसं शोधून सापडत नाहीत असे ऐकून होतो पण 2018 च्या बदल्यांमध्ये दोन चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली ती म्हणजे *श्री.नरेंद्र विजयराव देशमुख व श्री.नरेंद्र प्रकाशराव देशमुख*.दोघेही आपापल्या  वैयक्तिक गुणांनी माझ्यादृष्टीने ब्रँण्ड ठरलेले व्यक्तीमत्व.


*• श्री.नरेंद्र विजयराव देशमुख* ज्यांचा मोबाईल नंबर  Head Master या नावाने माझ्याकडे सेव्ह आहे असे आमचे लाडके बंधू.वक्तशीरपणा,शिस्तप्रिय,आदर्श अध्यापन व वर्गनियोजन,आदर्श शिक्षकाला लाजवेल असं यांच काम.*ढ *विद्यार्थ्यांना सरळ लाईनवर आणण्याचा यांचा हातखंडा शिकण्यासारखा आहे.चौथीपर्यंत शिकलेले पाढे यांच्या पाचवीच्या वर्गात आल्यानंतर योग्य उच्चाराने पाठ करून घेणे हा ठरलेला उपक्रम.माझ्या विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर मोत्यासारखं व्हावं म्हणून सत्राच्या सुरूवातीलाच वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वतःच्या खर्चाने शुद्धलेखनाची वही वाटणारे व न चुकता रोज शुध्दलेखन तपासणारे हे महाशय.अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना  सर्वांसोबत आणण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न हे करतात.  कार्यालयीन कामात एकछत्री अंमल व मोत्यासारख्या अक्षरामुळे शाळेतून,केंद्रातूनच नाही तर तालुक्यातून यांच्या मार्गदर्शन   व सहकार्याची अपेक्षा लोक ठेवतात.एखाद्या समस्येचे सर्वोत्तम समाधान यांच्याकडे  मिळते.


*•श्री.नरेंद्र प्रकाशराव देशमुख*- आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आवडते वक्ते ज्यांचा प्रत्येक शब्द प्रत्येकजण अगदी मनापासून ऐकतो.बोलण्यातील माधुर्य व अफाट ज्ञानाचा सागर या जोरावर प्रत्येकाला आपल्याकडे ध्यान केंद्रित करायला तुम्ही खरंच अद्वैत आहात.वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यांला क्षमतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन,सराव करून घेऊन सर्वोत्तम अध्यापन करतांना तुम्ही हरवून गेलेले मला वेळोवेळी दिसलात.एखाद्या गोष्टीशी तुमचा दुरदूरपर्यंत संबंध नसतांना त्याच्या विषयी असलेले तुमचे ज्ञान व तुमच्याकडून मिळालेली माहिती लय भारी वाटते राव.


👉🏻काही लोक फक्त सोबत असल्यामुळे आयुष्य समृद्ध होत राहतं तसं माझं झालं.वैयक्तिक माझा तुमच्या दोघांमुळे अवर्णनीय असा फायदा झालेला आहे हे नक्की.प्रत्येक गोष्ट दिसत नसते,दाखवायचीही नसते असेच काहीसे तुमच्या सहवासात तुमच्याकडून मला मिळत गेले मी ते घेत गेलो.तुमच्या वागण्या-बोलण्यातील  आपलेपणा,सहजपणा,विश्वास हा आपल्या सच्च्या मैत्रीला खतपाणी घालत गेला.ना कशाचा अहंकार,ना मोठ्या मोठ्या गप्पा,ना कुणाविषयी द्वेष,ना कोणासोबत बरोबरी,ना कशाची हाव,ना कसला स्वार्थ ..... थोडं .....पण चांगलं यात समाधान मानणारे तुम्ही दोघे नक्कीच  चांगली माणसं आहात नव्हे तर चांगल्या माणसांचे ब्रँण्ड अँम्बेसेडर आहात.माझ्यासाठी तुम्ही *ब्रँण्ड देशमुख* आहात.मोठ्या भावाप्रमाणे मिळालेली तुमची सावली अविस्मरणीय आहे.तुमचा दुरावा थोडे दिवस तरी जड जाणार आहे हे नक्की.


तुमच्या बदल्या झाल्या तरीही तुमचा जास्तीत जास्त सहवास पुढील आयुष्यातही मला लाभत राहो,तुमचे चालू असलेले शिक्षण क्षेत्रातील सेवेचे व्रत अधिकाधिक फुलत राहो हीच श्री गणेशा चरणी प्रार्थना 🙏🌷


-•~दिनेश दाभाडे~•-

➖▪️➖▪️➖▪️➖▪️➖▪️➖

2 comments:

  1. जीवन प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर काहीतरी शिकवून जातात...सुंदर लिखाण

    ReplyDelete
  2. अशी माणसे जीवनात आल्याने खूप काही शिकायला मिळते.

    ReplyDelete

भेटत राहा.....

  🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही * अजून वेळ हवा होता ...